विदर्भाचं पंढरपूर अशी ओळख असलेल्या धापेवाडा गावाचा पर्यटन आणि तीर्थस्थळाच्या दृष्टीने विकस होणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. त्यांच्या हस्ते नागपुरात धापेवाडा इथल्या विठ्ठल मंदिरातल्या १६४ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. धापेवाडा इथे टेक्स्टाईल पार्क, मंदिराचा जिर्णोद्धार, जलशुद्धीकरण प्रकल्प, स्टेडियम या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे होणार आहेत. ही परिवर्तनाची सुरुवात लोकांच्या सहकार्यानेच होत आहे, असं गडकरी यावेळी म्हणाले.
Site Admin | March 2, 2025 8:14 PM | Union Minister Nitin Gadkari
धापेवाडा गावाचा पर्यटन आणि तीर्थस्थळाच्या दृष्टीने विकास होणार-नितीन गडकरी
