रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विनारोकड उपचार देणारी योजना केंद्र सरकारनं आजपासून सुरू केली. याअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचारांसाठी कोणतीही रोख रक्कम द्यावी लागणार नाही. याशिवाय हिट अँड रनमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्लीत आज ही घोषणा केली.
गेल्या वर्षभरात देशभरात रस्ते अपघातात १ लाख ८० हजार व्यक्तींचा मृत्यू झाला. त्यापेैकी ३० हजार जण हेल्मेट न घातल्यानं मृत्यूमुखी पडले. मृतांमध्ये ६६ टक्के तरुण होते अशी माहिती गडकरी यांनी दिली.