क्रीडा क्षेत्रात उत्तेजक वापराविरोधातल्या प्रयत्नांत भारत आघाडीवर राहून काम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज युनेस्कोच्या क्रिडा क्षेत्रातल्या उत्तेजक वापराविरोधातल्या आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत कॉप नाईन विभागाची दुसरी औपचारिक बैठक तसंच निधी मंजुरी समितीची तिसरी बैठक आयोजित केली होती. या बैठकीच्या उद्घाटन सत्राला मांडवीय यांनी अध्यक्ष म्हणून संबोधित केलं.
उत्तेजक वापराविरोधातल्या प्रयत्नांत भारताची भगिदारी वाढत असल्याचं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं.