स्वतःचे फोर जी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या जगातल्या सहा देशांपैकी भारत हा एक देश असून लवकरच फाईव्ह जी तंत्रज्ञान विकसित केलं जाईल, असं प्रतिपादन केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज दिल्ली इथं केलं. बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडच्या नव्या लोगोचं आणि नव्या ७ सेवांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. बी एस एन एल च्या वापरकर्त्यांची संख्या गेल्या सहा महिन्यात ७५ लाखांवरून १ कोटी ८० लाख इतकी झाली आहे. बी एस एन एल आता स्पॅम फ्री नेटवर्क , नॅशनल वाय फाय रोमिंग , इंट्रानेट फायबर टीव्ही , डायरेक्ट टू डिव्हाईस, जनतेचं संरक्षण आणि आपत्ती निवारण यासारख्या सात सेवा ग्राहकांना पुरवणार आहे.
Site Admin | October 22, 2024 8:24 PM | BSNL
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते बीएसएनएलच्या नव्या लोगोचं उद्घाटन
