केंद्र सरकारनं स्टील उद्योगासाठी उत्पादन आधारित प्रोत्साहन योजना आज सुरू केली. विशेष स्वरुपाचं स्टील हा देशाच्या वृद्धीचा आधारस्तंभ आहे. उच्च दर्जाच्या स्टीलला असलेली मागणी, आयात कमी करायला आणि आत्मनिर्भर भारतासाठी योग्य संधी असल्याचं केंद्रीय स्टील आणि अवजड़ उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी म्हणाले.
देशातल्या स्टील उद्योगाला अधिकाधिक सवलती देण्यावर सरकारचा भर आहे. ही योजना अधिक गुंतवणूकस्नेही असल्याचं मंत्रालयाचे सचिव संदीप पोन्ड्रीक म्हणाले.
या योजनेअंतर्गत २७ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक, सुमारे १५ नागरिकांना रोजगार आणि अंदाजे ७९ लाख टन विशेष स्टीलचं उत्पादन करण्याचं नियोजन झालं आहे. गेल्या नोव्हेंबरपर्यंत १८ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आणि साडे ८ हजारांहून अधिक रोजगारांची निर्मिती स्टील उद्योगात झाली आहे.