शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर न करता उत्पादन वाढवता येऊ शकतं, असं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्दटलं आहे. लखनौ इथं नैसर्गिक शेतीच्या विज्ञानावरच्या प्रादेशिक सल्लामसलत कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
केंद्र सरकार नैसर्गिक शेतीसाठी अखिल भारतीय स्तरावरील जनजागृती मोहीम सुरू करणार आहे, सुरुवातीची दोन वर्षे उत्पादन कमी असेल त्यामुळे सरकार नैसर्गिक शेतीसाठी पहिली तीन वर्षे अनुदान देणार असल्याचं सांगत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केलं.