डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशभरात येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचं केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांचं आवाहन

देशभरात येत्या २९ ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचं आवाहन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी केलं आहे भारताला सुदृढ राष्ट्र बनवण्याच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नाचा पुनरुच्चार मांडवीय यांनी यावेळी केला. प्रधानमंत्र्यांच्या फिट इंडिया चळवळीचं महत्व अधोरेखित करत स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन सक्रिय राहणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिन केवळ आपल्या क्रीडापटूंचा गौरव करण्याची एक संधी नसून संतुलित आणि निरोगी जीवन जगण्याचं स्मरण आपल्याला करून देत असल्याचं मांडवीय यांनी म्हटलं आहे.    

सर्वाधिक वाचले

सर्व पहा