डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे ३ हजार ५१९ उद्योग शोधल्याची पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची माहिती

देशातली विविध राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळं आणि प्रदूषण नियंत्रण समित्यांनी प्रदूषणाला कारणीभूत ठरणारे ३ हजार ५१९ उद्योग शोधल्याची माहिती पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज लोकसभेत दिली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर कारवाई केल्यानंतर प्रचंड प्रदूषण करणाऱ्या ६६९ उद्योग बंद झाले आहेत. मात्र, उर्वरित २ हजार ८५० उद्योग अद्याप कार्यरत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यापैकी १०४ प्रदुषणकारी उद्योगांमध्ये पर्यावरण मानकांचं पालन केलं जात नसल्याचं आढळल्याचंही यादव यांनी यावेळी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा