समाज माध्यमं आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत आणि कठोर करण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. ते काल लोकसभेत पुरवणी प्रश्नांना उत्तर देत होते. आपल्या देशाची संस्कृती आणि हे प्लॅटफॉर्म जिथून आले आहेत त्या देशांत खूप फरक आहे, त्यामुळे, संसदेच्या संबंधित स्थायी समितीने हा मुद्दा उचलून धरावा आणि त्यासाठी कठोर कायदे करावेत अशी मागणी त्यांनी केली.
Site Admin | November 28, 2024 10:38 AM | Minister Ashwini Vaishnav