कवच या स्वयंचलित रेल्वे सुरक्षा यंत्रणेची चौथी आवृत्ती डिसेंबर २०३० पर्यंत संपूर्ण देशभरात लागू केली जाईल, असं उद्दिष्ट ठरवल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. देशात सर्वप्रथम कोटा ते सवाई माधोपूर मार्गावर ही यंत्रणा लावलेली आहे. त्याची पाहणी करण्यापूर्वी ते जयपूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते. १० हजार रेल्वे इंजिन आणि ९ हजार किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर लवकरच ही यंत्रणा लावली जाईल, असं ते म्हणाले.
Site Admin | September 24, 2024 8:37 PM | कवच 4.0 | रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव