देशाचा माता मृत्यू दर कमी व्हावा, यासाठी सरकार काम करत असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं कुटुंब नियोजनाबाबतच्या तज्ज्ञांच्या बैठकीत बोलत होत्या. लोकसंख्या स्थिर राहावी, यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळू लागलं असून, २०३० सालापर्यंत माता मृत्यूचा दर एक लाख बालकांच्या जन्मामागे ७० पेक्षा कमी राखण्याचं शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यात देशाला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Site Admin | July 19, 2024 8:38 PM | Anupriya Patel