केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आर.जी. कार रुग्णालयामधील बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची विनंती पुन्हा पत्राद्वारे केली आहे. पश्चिम बंगालमधल्या सध्याच्या जलदगती न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या खटल्यांवर चिंता अन्नपूर्णा देवी यांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम बंगालमध्ये ८८ जलदगती न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत, पण ती केंद्र सरकारच्या योजनेच्या शिफारशींनुसार नाहीत, असेही पत्रात नमूद आहे.
Site Admin | August 31, 2024 8:11 PM | Mamata Banerjee | POCSO | rape | Union Minister Annapurna Devi
बलात्कार आणि पॉक्सो प्रकरणे हाताळण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करण्याची केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांची ममता बॅनर्जी यांना विनंती
