भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई तसंच ठाणे आणि कोकण विभागातल्या भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतले भाजपचे मंत्री, आमदार, खासदार भाग घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत बैठक होणार असल्याचं समजतं.
Site Admin | October 1, 2024 3:55 PM | Maharashtra Assembly Elections | Mumbai | अमित शाह
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर
