डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी पायाभूत क्षेत्राशी जोडलं जाईल – गृहमंत्री अमित शाह

देशातल्या सर्व ८ कोटी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी पायाभूत क्षेत्राशी जोडलं जाईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज गुजरातमध्ये आणंद इथं राष्ट्रीय दुग्धविकास महासंघाच्या हीरक महोत्सवी समारंभात बोलत होते. 

 

देशात दुग्धोत्पादन क्षेत्रात ६ दरवर्षी टक्के दरानं वाढ होत असून जागतिक दूध उत्पादन वाढीपेक्षा हा वेग  अधिक आहे. येत्या पाच वर्षांत देशात २ लाख सहकारी दुग्ध संस्था स्थापन केल्या जातील अशी घोषणाही त्यांनी केली. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत सुरु असलेल्या अनेक उपक्रमांचं त्यांनी कौतुक केलं. भारतीय दुग्धोत्पादन एक जागतिक नाममुद्रा बनवण्यात राष्ट्रीय दुग्ध विकास महासंघाचं मोठं योगदान आहे, अशी प्रशंसा त्यांनी यावेळी केली. या  कार्यक्रमा दरम्यान, त्यांनी अनेक शेतकरी केंद्रित प्रकल्पांचं आणि नवीन वास्तूचं उदघाटन देखील केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा