दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केंद्रीय गृह मंत्रालयानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे केली आहे. जैन यांच्यावर खटला चालवण्याइतके पुरावे सक्तवसुली संचालनालयाकडून मिळाले आहेत, असं केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे. कथित आर्थिक अनियमितता आणि इतर आरोपांखाली जैन यांची चौकशी सुरू आहे.
Site Admin | February 14, 2025 8:04 PM | Union Home Ministry
माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी देण्याची गृहमंत्रालयाची राष्ट्रपतींकडे मागणी
