डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा संपूर्ण बीमोड करण्यासाठी दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाईसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू आणि काश्मीरमधल्या सुरक्षा स्थितीचा आढावा घेण्यासाठी शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक झाली. आगामी अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावाही त्यांनी घेतला.

 

जम्मू-काश्मीरमधला दहशतवादाविरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. दहशतवाद आता नियंत्रणात असून संघटित हिंसक दहशती कृत्यांऐवजी छुप्या संघर्षाचं रूप त्याला प्राप्त झालं असल्याचं शहा म्हणाले. सरकारच्या प्रयत्नांमुळे काश्मीर खोऱ्यातल्या दहशतवादी घटनांच्या संख्येत लक्षणीयरीत्या घट झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेत सुधारणा झाली असून मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत. तसंच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतदान झाल्याचंही शहा यांनी नमूद केलं.

 

काश्मीर खोऱ्यात दहशतवादाविरोधात ज्याप्रमाणे कठोर कारवाईची योजना राबवण्यात आली, तशीच योजना जम्मूतही राबवण्याचे निर्देश शहा यांनी या बैठकीत दिले. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला, गुप्तचर विभागाचे संचालक, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, नवनियुक्त लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी, या बैठकीला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा