नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं सरकार मोठं पाऊल उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. देशात आधी बारा जिल्हे नक्षली कारवायांनी ग्रासले होते, ते सहावर आणण्यात सरकारला यश आल्याचं गृहमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे सांगितलं. नक्षल चळवळीविरोधात कठोर कारवाई करत सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध भारताची निर्मिती सरकार करत आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षल चळवळ भारतातून समूळ नष्ट होईल, असं गृहमंत्री म्हणाले.
Site Admin | April 1, 2025 2:22 PM | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह | नक्षलमुक्त भारत
नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं सरकार मोठं पाऊल उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन
