डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 24, 2024 8:03 PM | Amit Shah

printer

मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादी समस्येतून मुक्त करण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन

येत्या मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादी समस्येतुन संपूर्ण मुक्त केलं जाईल असं प्रतिपादन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ते आज छत्तीसगढ़ची राजधानी रायपुर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. माओवाद्यांविरुद्धची लढाई आता अंतिम टप्प्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्मसमर्पण करायला इच्छुक असलेल्या माओवाद्यांसाठी छत्तीसगढ़ सरकार लवकरच एक नवीन आत्मसमर्पण धोरण राबवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दहशतवादाचा प्रभाव असलेल्या सर्व क्षेत्रात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन करण्याबरोबरच त्या क्षेत्रात विकासाचा वेग वाढवण्यासाठी आपलं सरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. या बैठकीला छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक तसंच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.