डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारासाठी विविध राजकीय पक्षांचा प्रचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज जम्मू इथं प्रचारसभा घेणार आहेत. कठुवा आणि उधमपूर जिल्ह्यातल्या चार प्रचारसभांना ते संबोधित करतील.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २८ सप्टेंबरला जम्मू इथं प्रचारसभा घेणार आहेत. दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जम्मूमध्ये प्रचारसभा घेतली. तसंच माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा घेतली.
हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कर्नाल इथं सभा घेणार आहेत. असांध मतदारसंघातल्या प्रचारसभेत ते संबोधित करतील. त्यानंतर ते हिसार जिल्ह्यात प्रचारसभा घेणार आहेत.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा