केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज त्रिपुरामध्ये ६६८ कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. भाजपा त्रिपुरामध्ये सत्तेत आल्यानंतर ब्रु समुदायाच्या ४० हजार लोकांचं पुनर्वसन झाल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. ब्रु समुदायाच्या प्रश्नांकडे आधीच्या डाव्या आघाडीच्या सरकारने लक्ष दिलं नाही अशी टीकाही त्यांनी केली. ब्रु समुदायातल्या लोकांना अनेक वर्षं मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित राहावं लागलं. नव्या वसाहतीमुळे त्यांना पिण्याचं शुद्ध पाणी, शौचालय, वीज जोडणी, शिक्षण अशा सुविधा मिळाल्या आहेत, असं शहा म्हणाले. राज्यातल्या अकर गावांमध्ये ब्रु समुदायाच्या लोकांना घरं देण्यासाठी सरकारने ९०० कोटी रुपये खर्च केला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | December 22, 2024 7:55 PM | Tripura | Union Home Minister Amit Shah