गेल्या १० वर्षांत देशातील दहशतवाद, डावी विचारसरणी, बंडखोरी आणि अंमली पदार्थ यांचा घातक परिणाम कमी करण्यात लक्षणीय यश मिळालं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मसुरी इथल्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये झालेल्या समारोप समारंभाला ते संबोधित करत होते. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ठोस धोरणांचे अपेक्षित परिणाम झाले आहेत.
३१ मार्च २०२६ पर्यंत डाव्या विचारसरणीचा समूळ नायनाट केला जाईल,” असं ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद, डाव्या विचारसरणीचे अतिरेकी, ईशान्येकडील बंडखोरी आणि अंमली पदार्थ ही देशासमोरील चार प्रमुख आव्हाने आहेत. १५० वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन कायद्यांच्या जागी तीन नवीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी केल्याने दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे देशाची न्यायव्यवस्था जगातील सर्वात आधुनिक व्यवस्था ठरेल, असंही शहा म्हणाले.