अमली पदार्थांचा व्यापार, सायबर गुन्हेगारी, दहशतवाद यासारखी संकटं देशाच्या जवानांच्या दृढ निश्चयाचा सामना करू शकत नाहीत असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं पोलीस स्मृती दिनानिमित्त हुत्मात्यांना शहा यांनी आदरांजली वाहिली, त्यावेळी ते बोलत होते. सुरक्षा दलांची कार्यक्षमता आणि समर्पण यामुळे गेल्या दशकभरात देशात शांतता प्रस्थापित करण्यात यश आलं आहे, असंही शहा म्हणाले.
नुकतेच लागू करण्यात आलेल्या तीन नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात झाल्यानंतर भारतात जगातली सर्वात आधुनिक गुन्हेगारीविरोधी न्याय व्यवस्था स्थापित होईल, कोणत्याही गुन्ह्यात केवळ तीन वर्षात न्याय मिळेल, असंही अमित शहा यांनी सांगितलं.