केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या पहिल्या शंभर दिवसांत सहकार मंत्रालयाने सुरू केलेल्या योजना आणि धोरणांविषयी माहिती देण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत राष्ट्रीय परिषदेला संबोधित करणार आहेत.
या शंभर दिवसांत सहकार क्षेत्रासाठी अनेक महत्वाची पावलं उचलण्यात आली, यामुळे सहकार व्यवस्थेला नव्या ताकदीने आणि गतीने पुुढे जायला मदत होईल, असं शहा आपल्या समाजमाध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हणाले.