डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनासंदर्भात समिती स्थापन करण्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं आश्वासन

डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात करायच्या उपाययोजनासंदर्भात एक समिती स्थापन करण्याचं आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलं आहे. डॉक्टरांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आज नवी दिल्लीत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिलं. या समितीमध्ये डॉक्टरांचे प्रतिनिधी, राज्य सरकार यांचेही प्रतिनिधी असतील. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी २६ राज्यात कायदे मंजूर झालेले आहेत. डॉक्टरांनी आंदोलन मागे घेऊन कामावर रुजू व्हावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलं आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा