केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी आज देशातल्या उष्णतेच्या लाटेची परिस्थिती आणि रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. तसंच या रुग्णालयांमध्ये विशेष कक्ष निर्माण करण्याचे निर्देश दिले. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील वैद्यकशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अजय चौहान यांनी बातमीदारांना ही माहिती दिली. उष्णतेच्या लाटेमुळं दिल्लीतल्या विविध रुग्णालयात सुमारे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेची परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालय नवीन धोरणांवर काम करत आहे, असंही ते म्हणाले.
Site Admin | June 19, 2024 8:31 PM | heat wave | JP Nadda
केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी घेतला उष्णतेच्या लाटेचा आढावा
