डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ग्रामीण भागात पतपुरवठ्यामधे वाढ झाली असल्याचं केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन

ग्रामीण भागात पतपुरवठ्यामधे वाढ झाली असून २०१४ मधे ७ लाख ३० हजार कोटी पतपुरवठा झाला होता त्या तुलनेत २०२४ मधे २५ लाख ४६ हजार कोटी रुपये पतपुरवठा झाला, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत दिली. एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून २०१४ मधे शेतकऱ्यांना सव्वाचार लाख कोटीपेक्षा जास्त पीक कर्जं देण्यात आली तर २०२४ पर्यंत ही रक्कम ९ लाख ८२ हजार लाख कोटींपर्यंत पोहोचली. कृषी उत्पादन वाढण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्रसरकारने विविद उपक्रम हाती घेतले आहेत, असं ते म्हणाले.मुद्रा योजना आणि स्टार्टअप इंडिया अशा योजनांमधून सरकारने युवावर्गाच्या कल्याणाच्याही योजना राबवल्या असल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं. लोकसभेत आज आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवर चर्चा होत आहे त्याचप्रमाणे गोवा विधानसभेत अनुसूचित जमातींना पुरेसं प्रतिनिधित्व देण्यासाठीचं पुनर्रचना विधेयक आज सभागृहात मांडलं जाऊ शकतं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा