जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी सरकार आणि उद्योगांनी जगभरात एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत भारतीय उद्योग संघाद्वारे आयोजित जागतिक आर्थिक धोरण मंचाच्या मेळाव्यात ‘जागतिक अर्थव्यवस्थेेसाठी दशकभराची प्राथमिकता’ या विषयावर त्या बोलत होत्या. जागतिक पातळीवरची परिस्थिती सामान्य करणं ही आजची प्राथमिकता आहे, असं सीतारामन म्हणाल्या. महागाई हे जगासमोरचं मोठं आव्हान असून देशादेशातील संघर्ष यामागचं कारण आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Site Admin | December 11, 2024 1:44 PM | Union Finance Minister Nirmala Sitharaman