केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेत वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टीन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण सहकार्य, उद्योग, प्रादेशिक सुरक्षा आणि इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, राजनाथ सिंह यांनी दोन्ही देशांदरम्यानच्या विकासाच्या संधींवर भर दिला. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या S.O.S.A अर्थात सुरक्षा पुरवठा व्यवस्थेबद्दल लॉईड आणि राजनाथ सिंह यांनी समाधान व्यक्त केलं.
Site Admin | August 24, 2024 2:21 PM | भेट | राजनाथ सिंह | संरक्षण सचिव लॉईड ऑस्टीन