भारत – अमेरिका संरक्षण भागीदारीमध्ये उभय देशांमध्ये वाढते सहकार्य, माहितीची देवाणघेवाण आणि औद्योगिक संशोधन यामध्ये अधिकाधिक प्रगती होत आहे, असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी व्यक्त केला. ते आज लाओस मधल्या व्हीएनटीएन इथं झालेल्या ११ व्या आशियन संरक्षणमंत्रांच्या बैठकी दरम्यान बोलत होते. या बैठकी दरम्यान राजनाथ सिंह यांनी न्यूझिलंडचे संरक्षण मंत्री ज्युडिथ कॉलिन्स ,दक्षिण कोरियाचे संरक्षण मंत्री किम योंग ह्युन यांची तसंच ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पॅट कॉनरॉय यांचीही भेट घेतली. राजनाथ सिंह यांनी न्यूझिलंडचे संरक्षण मंत्री ज्युडिथ कॉलिन्स यांना दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी आणि संरक्षण सहकार्य कराराला लवकर अंतिम रूप देण्याची विनंती केली.
Site Admin | November 21, 2024 8:01 PM | Defence Minister Rajnath Singh