केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या जनसुनवाई पोर्टलच अनावरण पीयूष गोयल यांनी आज मुंबईत केलं. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या व्यावसायिकांना याद्वारे प्रशासनासोबत थेट आणि पारदर्शकरित्या संवाद साधता येणार आहे. चहा, कॉफी, मसाले, रबर महामंडळ, अपेडा, परदेश व्यापार महासंचलनालय यांच्यासारख्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विभागांचा यात समावेश आहे. ECGC च्या सुधारित SMILE-ERP सुविधेचं लोकार्पणही त्यांनी केलं. जनसुनवाणी पोर्टलच्या माध्यमातून निर्यातदारांना त्यांच्या समस्या घरबसल्या सोडवता येणार आहेत. व्यापार मंडळाच्या सदस्यांची बैठकही त्यांनी घेतली. १० राज्यांचे मंत्री या बैठकीला उपस्थित होते. यावेळी गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू यासारख्या राज्यांनी निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या उपाय योजनांवर चर्चा झाली.
Site Admin | September 13, 2024 7:17 PM | Minister Piyush Goyal