शाश्वत कृषी क्षेत्रासाठी पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि अन्नसुरक्षेसाठी स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशाने कृषि उन्नती योजना अशा दोन योजनांना केंद्रिय मंत्रीमंडळाने काल मंजुरी दिली. या दोनही योजनांसाठी एकंदर 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांशी बोलताना दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणं आणि मध्यम वर्गीयांना अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी या योजना आधारस्तंभ ठरतील असं ते म्हणाले. उर्जा क्षेत्रातील शाश्वत हरित विकास आणि कार्बन वायू उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी भारत वचनबद्ध आहे. या पार्श्वभूमीवर जगभरात ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी काम करणाऱ्या संघटनेत सहभागी होण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळ बैठकीत परवानगी देण्यात आली. यासह चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यालाही मंजुरी देण्यात आली.
Site Admin | October 4, 2024 12:13 PM | agriculture sector | Union Cabinet | कृषी क्षेत्र