डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

खरीप हंगामासाठी केंद्रीय मंत्रीमंडळाची १४ पीकांच्या MSPला मंजुरी

खरीप हंगामासाठी १४ पीकांसाठीच्या MSP अर्थात किमान आधारभूत किंमतीला केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही किंमत किमान ५० टक्क्यांनी अधिक असेल याची खबरदारी घेतल्याचं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. धान, कापूस, ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, मूग, तूर, उडीद यासारख्या धान्यांचं किमान आधारभूत मूल्य मंत्रीमंडळानं आज मंजूर केलं. यामुळं शेतकऱ्यांना एकूण २ लाख कोटी रुपयांचा लाभ मिळेल, असं ते म्हणाले.

 

वाढवण बंदराच्या उभारणीलाही परवानगी

 

केंद्र सरकारनं आज पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदराच्या उभारणीलाही मंजुरी दिली. हा निर्णय घेताना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात विचारविनिमय करण्यात आला, तज्ञांसह स्थानिकांचा सल्ला घेतला होता अशी माहिती वैष्णव यांनी दिली. यासाठी ७६ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. यातून १२ लाख रोजगार निर्माण होतील, असं त्यांनी सांगितलं. सध्या देशात २० दशलक्ष TEU कंंटेनर वाहून नेण्याची क्षमता आहे. या एकट्या बंदरात २३ दशलक्ष TEU कंटेनर वाहून नेण्याची क्षमता असल्याचं वैष्णव म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा