डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

ठाणे, पुणे आणि बेंगळुरूमधल्या मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातल्या तीन नवीन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज हा विस्तारित प्रकल्प; ठाणे रिंग मेट्रो आणि बंगळूरू मेट्रो प्रकल्पाचा यात समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ठाणे एकात्मिक रिंग मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा अंदाजित खर्च १२ हजार २०० कोटी रुपये आहे. पुण्यातल्या स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गासाठी २ हजार ९५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुणे महापालिकेचा त्यामध्ये वाटा असेल. बंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा- ३ लाही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी एकूण १५ हजार ६११ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा