डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज बहुप्रतिक्षित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. या ३०९ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची आज बैठक झाली. महाराष्ट्रतले २ आणि मध्यप्रदेशातले ४ जिल्हे यातून जोडले जाणार आहे. या मार्गावर ३० रेल्वे स्थानकं असतील, यामुळं १ हजार गावांना आणि ३० लाख नागरिकांना याचा फायदा होईल, असं वैष्णव म्हणाले. यामुळं उत्तर महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक जिल्ह्यांना आणि मध्यप्रदेशातल्या भरड धान्य उत्पादन जिल्ह्यांना फायदा होईल, असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. या रेल्वेमार्गासाठी पावसाळी अधिवेशनात रेल्वेमंत्र्यांना पत्र दिलं होतं. आता याला मंजुरी मिळाल्याबद्दल धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. धुळेकर नागरिकही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत आहेत. 

 

शेतकऱ्यांसाठीच्या १३ हजार ९६६ कोटी रुपयांच्या ७ योजनांनाही केंद्रीय मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. त्यात डिजिटल कृषी मिशन, कृषी विज्ञानाद्वारे खाद्य आणि पोषणमूल्य जतनाचा समावेश आहे. यामुळं कृषी क्षेत्रात अनेक नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. कृषी क्षेत्रातलं शिक्षण व्यवस्था बळकट कार्यासाठी २ हजार कोटींहून अधिक रकमेच्या निधीलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. 

 

जनावरांचं प्रजनन आणि आरोग्य, फलोत्पादन, कृषी विज्ञान केंद्राचं आधुनिकीकरण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या व्यवस्थापनासाठीच्या विविध योजनांना मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. 

 

मंत्रीमंडळांना आज गुजरातमधल्या साणंदमध्ये एक सेमीकंडक्टर प्रकल्प उभा करायलाही मंजुरी दिली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा