डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आठव्या वेतन आयोगाची स्थापना करायला केंद्र सरकारची मंजुरी

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याच्या शिफारशी 2026 पासून लागू होतील. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे. तोपर्यंत या वेतन आयोगाच्या शिफारसी प्राप्त होतील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल माध्यमांशी बोलताना सांगितलं.

 

आयोगाचे अध्यक्ष आणि 2 सदस्यांची नेमणूक लवकरच होईल, असंही ते म्हणाले. श्रीहरीकोटा इथं सतीश धवन अंतराळ केंद्रात तिसरं लाँच पॅड उभारायलाही केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. चंद्रावर मानव पाठवण्याच्या इस्रोच्या आगामी मोहिमांसाठी याचा वापर होईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा