शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचं उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनानं सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल अहिल्यानगर जिल्हयामध्ये केलं. राहाता तालुक्यातल्या बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकरी परिसंवादात चौहान बोलत होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी मंत्रालयानं सुरू केलेल्या विविध योजनांचा आढावा चौहान यांनी घेतला तसंच कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. लखपती दीदी आणि यशवंत शेतकऱ्यांचा यावेळी चौहान यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.