केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं उद्घाटन केले. या NPPS च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कीटकनाशकांची माहिती मिळेल तसंच शेतकरी त्यांच्या हानिकारक प्रभावापासून पिकं वाचवू शकतील. अशी माहिती चौहान यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाला सुमारे पाचशे शेतकरी उपस्थित होते.
Site Admin | August 16, 2024 10:47 AM
राष्ट्रीय कीटक निरीक्षण प्रणालीचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन
