उत्तराखंडमधे येत्या जानेवारीपासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सांगितलं. उत्तराखंड गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या डेहराडून इथं झालेल्या बैठकीत धामी यांनी ही माहिती दिली. समान नागरी कायदा लागू करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य ठरणार असल्याचं ते म्हणाले. सामाजिक समानता आणि एकता अधिक दृढ करण्याच्या दिशेनं हा एक मैलाचा दगड असल्याचं त्यांनी सांगितलं. या कायद्याची अंमलबजावणी करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे असा उल्लेख प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत केल्याबद्दल धामी यांनी आभार मानले.
Site Admin | December 18, 2024 8:09 PM | CM Pushkar Singh Dhami