जगभरातल्या बालकांना युनिसेफकडून दिल्या जाणाऱ्या आरोग्य आणि पोषण मदतीसाठी योगदान देणारा भारत हा सर्वात मोठा तिसरा देश आहे, असं युनिसेफच्या पुरवठा विभाग संचालक लीला पक्कला यांनी म्हटलं आहे. भारतातले व्यापारी सुमारे ६० लाख डॉलर्स किमतीच्या वस्तू आणि सेवा युनिसेफला पुरवत असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताकडून मिळणाऱ्या जीवरक्षक वस्तू आणि सेवा म्हणजे जगभरातल्या असुरक्षित बालकांच्या हितासाठी युनिसेफ राबवत असलेल्या मोहीमेचा मुख्य आधार आहे, असंही त्या म्हणाल्या.
Site Admin | October 12, 2024 7:27 PM | #unicef