चीन किंवा जपानपेक्षा भारतात शिक्षणासाठी जास्त खर्च करण्यात येतो असं युनेस्कोच्या पाहणीत आढळलं आहे. भारतात शिक्षणावरचा खासगी आणि सरकारी खर्च आशियातल्या इतर देशांपेक्षा जास्त असल्याचं युनेस्कोच्या अहवालात म्हटलं आहे. २०१५ ते २०२४ या काळात शिक्षणाला प्रोत्साहन देण्याकरता स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या ४ पूर्णांक १ दशांश टक्के ते ४ पूर्णांक ६ दशांश टक्के खर्च भारतात करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रांनी २०३० पर्यंतच्या कालावधीसाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टांमधे म्हटलंय की राष्ट्राच्या जीडीपीच्या ४ ते ६ टक्के तरतूद शिक्षणासाठी असावी.
Site Admin | October 24, 2024 2:34 PM | China | Education | India | Japan | Unesco