युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश करण्यासाठी शिवकालीन १२ गडकिल्ल्यांना जागतिक वारसास्थळ समितीचं आवश्यक नामांकन मिळाल्याचं महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी सांगितलं. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे. या किल्ल्यांचा अंतिम यादीत समावेश व्हावा यासाठी सादरीकरण करण्यासाठी शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचं शिष्टमंडळ पॅरीस इथं पोहोचलं आहे.
Site Admin | February 24, 2025 1:52 PM | Chhatrapati Shivaji Maharaj Fort | Unesco
शिवकालीन १२ गडकिल्ल्यांना युनेस्कोचं नामांकन
