संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेत आज गाझा पट्टीत सुरु असलेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी करण्या संदर्भातला ठराव मंजूर झाला. यावेळी सर्व युद्धबंद्यांना तात्काळ सोडण्याचीही मागणी करण्यात आली. १९३ सदस्यांच्या राष्ट्रसंघातल्या १५८ सदस्यांनी युद्धबंदी करण्याच्या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं.