बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर तिथल्या लष्करी आणि राजकीय अधिकाऱ्यांनी देशात शांततापूर्ण लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येऊन काम करावं, असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं आहे. बांगलादेशच्या नागरिकांचे लोकशाही आणि मानवी हक्क अबाधित राहावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
Site Admin | August 6, 2024 3:36 PM | Bangladesh
बांगलादेशात लष्कर आणि राजकीय नेत्यांनी लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचं संयुक्त राष्ट्रांचं आवाहन
