डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 1, 2024 8:13 PM | Polio Vaccine

printer

गाझा पट्टीत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध यंत्रणांमार्फत ६ लाख ४० हजार बालकांना पोलिओ लस

पश्चिम आशियात संघर्ष ग्रस्त गाझा पट्टीत संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विविध यंत्रणांमार्फत ६ लाख ४० हजार बालकांना पोलिओ लस देण्याची मोहीम आजपासून सुरु झाली. गेल्या महिन्यात या परिसरातल्या बालकाला टाईप २ च्या पोलिओची लागण झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं. त्यानंतर ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेकरता गाझात ३ सलग दिवस युद्ध थांबवण्याला इस्राएल आणि हमासने संमती दिली आहे. मात्र हा युद्धविराम तात्पुरता असून ही युद्धबंदी नसल्याचं इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्ट केलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा