ठाणे जिल्ह्यात उल्हासनगर इथे आज तीन गाड्यांची धडक होऊन झालेल्या अपघातात ५ जण जखमी झाले आहेत. उल्हासनगरच्या व्हिनस चौकात आज सकाळी एका गाडीने आधी रिक्षाला आणि नतर एका दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. रिक्षाचालकासह दोन प्रवासी आणि दोन दुचाकीस्वार या अपघातात जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या दुर्घटनेतला कारचालक फरार झाला असून सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Site Admin | December 24, 2024 3:19 PM | Thane