डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

यूजीसी-नेट जून २०२४ परीक्षा रद्द

सरकारनं यूजीसी-नेट जून २०२४ परीक्षा रद्द केली आहे. ही परीक्षा नव्यानं घेण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे कळवली जाणार आहे. भारतीय सायबर गुन्हे गुप्तवार्ता केंद्राकडून परीक्षा यंत्रणेत गैरप्रकारांच्या शक्यतेबाबत माहिती मिळाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी सीबीआयकडे तपास सोपवण्यात आला आहे.

राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल्या गुरुवारी दोन सत्रांमध्ये ही नेट परीक्षा घेतली होती. 

नीट परीक्षेत झालेला गोंधळ  ताजा असताना नेट परीक्षा रद्द करण्याचा प्रकार म्हणजे सरकारच्या अकार्यक्षमतेचा आणखी एक नमुनाच असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने  दिली आहे. वर्षभर अतिशय प्रामाणिकपणे अभ्यास करून विद्यार्थी परीक्षा देत असतात आणि या परीक्षाच ग्राह्य धरल्या जात नसतील तर काय उपयोग असा सवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी समाजमाध्यमावर उपस्थित केला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा