विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात (UGC)नं पुढील वर्षीपासून पदवीपूर्व प्रवेशासाठी घेण्यात येणारी (CUET-UG) या सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेत अनेक बदल करत असल्याची माहिती आयोगाचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी काल दिली. पुढील वर्षापासून CUET-UG साठी इयत्ता 12 वी मध्ये कोणत्याही विषयांत शिकत असलेल्या विद्यार्थाला ही परिक्षा देता येणार आहे. यापुर्वी विज्ञान शाखेतील अनिवार्य विषयांसह ही परिक्षा देता येत होती. CUET-UG आता फक्त संगणक आधारित चाचणी होईल. CUET-UG पुढील सत्रापासून ३७ ऐवजी ६३ विषयांमध्ये घेण्यात येईल.
Site Admin | December 11, 2024 9:43 AM | Entrance Exam | UGC