वर्ष २०२५ पासून सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा , फक्त सी बी टी अर्थात संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्यात येईल , अशी माहिती विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष एम . जगदीश कुमार यांनी आज बातमीदारांना दिली. विदयार्थ्यांनी १२ वीच्या परीक्षेसाठी निवडलेले विषयच या परीक्षेत घेण्याचं बंधन असणार नाही. या परीक्षेचा कालावधी एक तासाचा राहील आणि सर्व प्रश्न अनिवार्य असतील.पूर्वीसारखे पर्यायी प्रश्न दिले जाणार नाहीत.या अगोदर ३७ विषयांच्या परीक्षा घेतल्या जात होत्या . आता ६३ विषयांच्या परीक्षा घेतल्या जातील. विद्यार्थ्यांना जास्तीतजास्त ५ विषयांची निवड करता येईल. पूर्वी विद्यार्थ्यांना ६ विषयांची निवड करता येत असे. आयोगानं स्थापन केलेल्या तज्ज्ञांच्या समितीनं या परीक्षेचा आढावा घेऊन वरील बदल सुचवले आहेत.
Site Admin | December 10, 2024 7:07 PM | CUET-UG
वर्ष २०२५ पासून सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा फक्त संगणक आधारित चाचणी स्वरूपात
