राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज दिल्लीत राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान इथं आयोजित उद्यम उत्सवात सहभागी होणार आहेत . केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने याचं आयोजन केल असून, या उद्योगांतून तयार होणाऱ्या भारतीय पारंपरिक वस्तूंच्या उत्पादनांना प्रोत्साहन आणि बाजारपेठ मिळवून देणं, हा या उत्सवामागचा उद्देश आहे.
यामध्ये, महिला स्वयं सहाय्यता गट, प्रधानमंत्री विश्वकर्मा आणि आदिवासी योजनेतील लघु उद्योजक तसच खादी आणि इतर ग्रामीण लघु उद्योजक यांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांच प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. त्याच बरोबर लोकसंगीत, नुककड नाटक, राजस्थानी पपेट शो, मातीची भांडी तयार करण्याच प्रात्यक्षिक आदि सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले असून हा उत्सव येत्या ३० मार्चपर्यंत चालेल.