स्थानिक पातळीवर केलेल्या सुधारणांमुळे उद्योग स्नेही वातावरण वाढीला लागून विकसित राष्ट्र बनण्याच्या देशाच्या प्रवासाला दिशा मिळते, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं झालेल्या उद्योग समागम २०२४ या कार्यक्रमात गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग आणि वाणिज्य मंत्र्यांच्या परिषदेत ते आज बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते उद्योग सुधारणा कृती आराखड्या अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला तसंच नियामक अनुपालन पुस्तिकेचं प्रकाशन झालं.
Site Admin | September 5, 2024 8:10 PM | Udhyog Samagam 2024